मृग नक्षत्रातील तेजोमेघ - ओरायन नेब्युला

काही दिवसांपूर्वी मी ओरायन नेब्युला (मृग नक्षत्रातील तेजोमेघ) ह्याचा फोटो काढला. फोटो दिसायला खूप सुंदर तर आहेच, पण तो काढायला बरेच कष्ट आणि वेळही खर्ची पडला आहे.
ह्या निमित्ताने ह्या फोटोमधून आपल्याला नक्की काय माहिती समजते, त्यातील रंगांचा किंवा गडद भागांचा अर्थ काय ह्याचा एक 'थोडक्यात' आढावा घेऊया.

ओरायन नेब्युला
नक्षत्र: मृग (Orion the Hunter)
पृथ्वीपासूनचे अंतर: सुमारे १३४० प्रकाश वर्ष
आकार: सुमारे २४ प्रकाश वर्षे

हा तेजोमेघ मुख्यत: हायड्रोजन वायू आणि धुलीकणांनी बनलेली एक प्रचंड मोठी प्रणाली आहे. येथे आपल्या सूर्यासारखे अनेक तारे तयार होण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ह्यातील लाल/गुलाबी रंग हा हायड्रोजन वायू गरम होऊन त्यातून निघणाऱ्या प्रारणांमुळे आहे (H II region). तर निळसर रंग हा येथील अतिउष्ण निळ्या ताऱ्यांचा प्रकाश परावर्तीत झाल्यामुळे आहे.

भाग १ - चार ताऱ्यांनी बनलेला मध्य भागातील चौकोन (Central Quadrilateral)

May be an image of text

ह्यातील प्रत्येक तारा सूर्यापेक्षा अनेक पटींनी तेजस्वी आणि अधिक प्रमाणात उर्जा उत्सर्जित करणारा आहे. त्यांच्यातून निघणार्या ऊर्जेमुळे आणि अतिउष्ण भारीत कणांमुळे (charged particles) आजूबाजूच्या परिसरास एक अर्ध-गोलाकार आकार आला आहे. आपला सूर्यसुद्धा असे भारीत कण उत्सर्जित करीत असतो त्याला आपण सौरवात (solar winds)असे म्हणतो.

भाग २ - तेजोमेघास आलेला कंस सदृश आकार (Cavern)

No photo description available.

मध्यभागातील तेजस्वी ताऱ्यांतून येणाऱ्या उत्सर्जनामुळे संपूर्ण परिसरास एखाद्या गोलाकार कंसाचा आकार आलेला आहे. ह्या परिसरातील वायू उष्णतेमुळे ionize (अणुमधून इलेक्ट्रोन वेगळा) झाला आहे.

भाग ३ - M43

No photo description available.

मध्यभागी दिसणारा एकमेव तेजस्वी तारा ह्या लहान भागावर राज्य करीत आहे. हा लहान परिसर म्हणजे एक वेगळा तेजोमेघ आहे, ज्याचे गुणधर्म ओरायन सोबत मिळते जुळते आहेत.

भाग ४ - धुलीकण आणि त्यामुळे अडला जाणारा प्रकाश (Dark dust patches)

No photo description available.

ह्या भागात धुलीकण आहेत, जे त्यांच्या पलीकडे असणार्या ताऱ्यांचा प्रकाश अडवतात. त्यामुळे हे भाग गडद दिसतात. ताऱ्यांकडून येणारी अतिउष्ण प्रारणे ह्यांची जिझ करीत आहेत, आणि त्यांचा आकार कमी कमी होत आहे.

भाग ५ -  फुगे आणि कंस (Bubbles and Arcs)

No photo description available.

ताऱ्यांकडून येणारे भारीत कण (charged particles) आजूबाजूचा परिसर अक्षरशः पोखरून काढत आहेत. त्यामुळे येथे छोट्या फुग्यासारखा तसेच अनेक लहान कंस (arc) आकार तयार झालेले दिसत आहेत.

 

माहिती आणि फोटो नावासहित पुढे सारण्यास पूर्ण परवानगी.
भूषण करमरकर
हा फोटो कसा काढला ह्याची माहिती आमच्या इंस्टाग्राम पेज वरती दिलेली आहे
https://www.instagram.com/amateur_astronomers_group/
Comments

No Comments posted yet...

Post a Comment

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.