चंद्राविषयी थोडंसं

चंद्राविषयी थोडंसं

  • चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह ! चंद्र सुमारे २७.३ दिवसांनी तो पृथ्वीभिवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.
  • चंद्राची कला ज्याप्रमाणे रोज बदलते, तसेच त्याचा (दृश्य) आकार सुद्धा बदलत असतो. सध्या डोळ्यांनी हे ओळखता येणे अवघड आहे, पण दुर्बिणीतून बघता हे समजते. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे चंद्राची कक्षा हि लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे प्रत्येक "चंद्र-मासातून" एकदा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, तर एकदा सर्वात लांब असतो. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि पौर्णिमा असते, त्याला सुपरमून म्हणतात !
  • वरती फोटो बघा, चंद्राच्या दोन वेगळ्या कला एकाच दुर्बिणीतून, एकाच ठिकाणाहून, एकाच कॅमेरातून आणि एकाच झूम सेटिंग वर काढले आहेत. दृश्य आकारामधील फरक स्पष्ट कळतो आहे.

चंद्राची आकाशातील स्थिती -

अमावस्या झाल्यानंतर चंद्र हा सूर्यास्तानंतर पश्चिमेकडे दिसू लागतो. शुक्ल पक्षात "प्रथमा" तिथीच्या दिवशी चंद्र सूर्यापासून अगदी जवळ दिसतो, "द्वितीयेला" थोडा लांब, आणि तृतीय चतुर्थी..असं करत हळू हळू तो पूर्वेकडे सरकतो, सूर्यापासून लांब दिसू लागतो. त्याच कारणामुळे तो अधिक वेळ आकाशात दिसू लागतो.
पौर्णिमेच्या दिवशी (म्हणजेच अमावास्येपासून पंधरा दिवसांनी), चंद्र सूर्यापासून इतका लांब जातो की सूर्य मावळला की चंद्र पूर्वेस उगवतो. ह्या सुमारास त्याची पृथ्वीभोवती अर्धी फेरी पूर्ण होते. पौर्णिमा ते अमावस्या ह्या वद्य काळात, चंद्र तिथी गणिक अधिक उशिरा उगवू लागतो. चतुर्दशीला सूर्याच्या अगदी दहा पंधरा मिनिटे आधी उगवतो. अमावस्येला जवळपास सुर्यासोबतच उगवतो आणि मावळतो.
आणि मग हे चक्र चालू राहते.

- भूषण




Comments

Nilesh pandurang borate
मी चंद्राच्या कलेवरून व आकारमाना वरून अमावस्या व पौर्णिमा ओळखणे या विषयावर निरीक्षण करून त्याचे निष्कर्ष काढले आहेत, त्यामुळे मला आकाशात चंद्र पहिला असता पंचांग ,भारतीय सण याची ओळख ही आपोआपच झाली
29-03-2021 07:07 pm

Post a Comment

CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.