शनी इज बॅक !

    शनी दुर्बिणीतून बघितला की आपल्याला त्याची सुंदर कडी नजरेस पडतात. ही कडी बर्फाच्या लहान तुकड्यांपासून बनलेली आहेत, ज्यांचे आकार काही सेंटीमीटर ते काही मीटर मोठे आहेत.
ह्या कड्यांमध्ये आपण विस्तीर्ण आणि चमकदार A रिंग आणि B रिंग, आणि त्या दोन्हीमध्ये असणारी पोकळी (गॅप) एका लहान दुर्बिणीसह पाहू शकतो. या अंतराला "कॅसिनी विभाजन" (Cassini  Division) असे म्हणतात. A रिंग आणि B रिंग वगळता इतर अनेक कडी शनीभोवती आहेत, पण ती बघण्यासाठी अद्ययावत दुर्बिण आणि कॅमेऱ्याची गरज लागते.

माझ्याकडे असणाऱ्या दुर्बिणीतून ह्या कड्यांचे मी निरीक्षण करत आलोय आणि फोटो सुध्दा काढले आहेत. त्यावरून जी माहिती आपल्याला समजते ती थोडक्यात बघूया.